परवा परवा बातमी वाचली माळशेज घाटातल्या खोल दरीत १५ जण अडकले आणि त्याचा व्हिडिओ समोर आला ,सिंहगडावर एकाचा ट्रेक करताना अस्वस्थ वाटल्याने मृत्यू झाला. पन्हाळगडाची ऐतिहासिक भिंत कोसळली. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी पुरातत्त्व विभागाने गड-किल्ल्यांवर रात्री मुक्काम करण्यास बंदी घातली .
अशा बातम्या आजकाल आपण रोजच वाचत आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने व असंख्य ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या रक्ताभिषेकाणे पावन झालेल्या, छत्रपतींच्या पराक्रमाचे साक्ष देणारे असंख्य गडकोट व त्यावरील ऐतिहासिक वास्तू ह्या आपण गेल्या कित्येक पिढ्यात केलेल्या दुर्लक्षामुळे अक्षरशः मोडकळीस आलेल्या आहेत. तरी शासन जरी या विषयात लक्ष घालत नसलं तरीही आपल्यावर एक जबाबदारी पडते ती या असंख्य गडकोटांची काळजी घेण्याची व त्यांचे पवित्र अबाधित ठेवण्याची तसेच त्यावर जाणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताच्या सुरक्षिततेची !
त्याबद्दल आपण आज थोडसं बोलू….
गड किल्ल्यांच्या काळजीसाठी आपण काय करू शकतो.
१) प्रथमत: गड-किल्ल्यांवर जाताना स्वतःच्या सुरक्षेसाठी तसेच किल्ल्याच्या पावित्र्यासाठी आपण दारू, तंबाखू, सिगारेट असं कोणत्याही प्रकारचे व्यसन अगदी कटाक्षाने टाळलं पाहिजे. अगदी किल्ल्याच्या परिसरातच नव्हे तर आपल्या घरून निघाल्यापासून घरात परत येईपर्यंत अशा प्रकारचे व्यसन अगदी कटाक्षाने टाळणे गरजेचे आहे. तसेच आता शासनाने निर्णय घेतलेला आहे गट कोटांवर मद्यपान केलेल्या अवस्थेत सापडल्यास तीस हजार रुपये दंड..
२) गडकोट संवर्धनासाठी आज कित्येक संस्था काम करत आहेत सह्याद्री प्रतिष्ठान, राजा शिवछत्रपती परिवार अशा संस्थांना एक रुपया का होईना दर महिना देता आला पाहिजे.
३) अगदी वर्षातून एकदा का होईना एक दिवस का होईना कुठल्यातरी किल्ल्यावरती श्रमदान करायला एखाद्या संस्थेसोबत जावंच.
४) गडावर गेल्यावरती कागदाचा तुकडा देखील खाली आपल्याकडून पडता कामा नये.प्लास्टिकची बॉटल जशी सोबत नेली आहे अगदी तशी मोकळी बाटली घरी आणायची. किल्ले वासोटा वरती याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळते.
५) किल्ल्यावर असणाऱ्या दुकानात तिथला आपला कचरा आपण खाली आणला पाहिजे.तसेच त्या स्थानिकांना ही या गोष्टी समजून सांगायला हव्यात.
६) वरील जे काही दोन तीन गोष्टी आपण आपल्या सोबतच्या एकाला जरी शिकवल्या तरी खुप मोठा बदल होईल.
७) या चुकीच्या गोष्टी करणार जर कोणी आपल्याला दिसुन आले तर हया गोष्टी आपण त्यांना समजुन सांगयला हव्यात.
या गोष्टी जरी आपण केल्या तरी किल्ल्याचे पावित्र्य आणि स्वच्छता खूप मोठ्या प्रमाणात अबाधित राहील.
गेल्या काही वर्षातले हे दुर्दैवी प्रसंग वाचून मग आपलं काय चुकतंय हे लक्षात येईल.
जुलै २०२२ मध्ये शिवकालीन साल्हेर किल्ल्यावर मालेगाव येथील १२ मित्र पर्यटनासाठी गेले होते. किल्ल्यावर ट्रेकिंग करत असताना पाय घसरल्याने दोन तरुण दरीत कोसळले. या दुर्घटनेत भावेश अहिरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर मनीष मुठेकर हा तरुण जखमी..
२०२० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडावर नवीन वाट शोधताना जगप्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृत्यू.
२०१८ मध्ये त्र्यंबकेश्वरजवळील हरिहर गडावरही पाय घसरून दरीत पडल्याने एका महिलेचा मृत्यू .
परवा परवा बातमी वाचली माळशेज घाटातल्या खोल दरीत १५ जण अडकले आणि त्याचा व्हिडिओ समोर आला.
सिंहगडावर एकाचा ट्रेक करताना अस्वस्थ वाटल्याने मृत्यू झाला.
सोमनाथ शिंदे वय २६ हा तरुण ट्रर तैलबैला इथे equipment च्या चुकीमुळे मृत्यू झाला
१. कोणताही ट्रेक करताना आधी पुरेशी झोप झाली असली पाहिजे .
२. पोटभर जेवल्या जेवल्या चढाई ला सुरवात करू नये .
३.शक्यतो भर उन्हात चढाई टाळावी.
४.पाठीवर चा भार अती नसावा आणी समतोल असलेली बॅग असावी .
५.कमी वेळात जास्त चढाई करून दाखवतोच हा अट्टाहास नसावा .
६.पाऊलातलं अंतर कमी टाकावं ..बेबी स्टेप्स .
७.धाप लागेपर्यंत स्वतःला स्ट्रेच करू नये
८.पुरेसे पाणी पीत राहावं.एकदम घटाघट पाणी पिऊ नये.थोडं थांबून एक एक घोट पाणी बसून प्यावे.
९. केळ नक्की जवळ असावं . tang वैगेरे तर option आहेतच .
१०. रोजचा थोडाफार सराव असल्याशिवाय पाठीवर भालिमोठी बॅग घेऊन मोठे ट्रेक करू नयेत .
११. प्रवासात आणि ट्रेक दरम्यान कसलहि व्यसन करु नये.
१२ आपल्याला कोणते आजार आहेत याची आपल्याला व आपल्या सोबतीला देखील माहिती हवीच .
१३ अतिआत्मविश्वास नकोच .
आधी आपली शरीरिक मानसिक तयारी असावी लागते किंवा उठलो आणि गडकोट वारी ला चाललो अस करू च नये. " सराव करा अन मग सह्याद्री जवळ करा कारण थकलेल्या मनाला सह्याद्री कधीच नाराज करत नाही. जय शिवराय
1 Comments
"Great Share "
ReplyDelete