ससा आणि कासवाची गोष्ट ऐकत आपण लहानाचं मोठं झालेलं आहोत. त्या गोष्टीत ससा गतीने पुढे जातो आणि काही काळ थांबतो व ती स्पर्धा हरतो,पण कासव मात्र सातत्याने सतत हळू हळू चालून का होईना ती स्पर्धा जिंकते. ही गोष्ट तर आपण आज पर्यंत ऐकत आलेलोच आहोत.पण गेल्या काही दशकांपूर्वी हळूहळू का होईना माणसाने केलेला चुकांमुळे आज समुद्री कासवांच्या सर्व सातच्या सात प्रजाती धोक्यात आलेल्या आहेत..आज आपण यापैकीच एक ऑलिव्ह रिडले कासव या समुद्री कासवांच्या प्रजाती बद्दल बोलणार आहोत. मित्रांनो साधारण फेब्रुवारी चा महिना चालू झाला कि सोनेरी वाळूत आपले इवले इवले पाय उमटवत हि कासवांची पिल्ले आईच्या कुशीत जावं अगदी तस समुद्राच्या पोटात जातात.दिसायला अतिशय सुंदर असणार हे दृश्य अगदी कासवांची यात्रा भरल्या सारखे दिसते पण या यात्रेमागे मानवी चेहऱ्याचे दोन वेगळी रूपे अगदी स्पष्ट दिसून येतात आणि माणसाने अविचाराने केलेल्या कृतीचा निसर्गावरती काय परिणाम होतो हे अगदी स्पष्टपणे दिसून येईल. चला तर मग जाणून घेऊयात या बद्दल आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये......
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास या गावातील समुद्रकिनाऱ्यावर आता ही कासवांची जत्रा भरते. त्या मागे आपण जाणून घेतलं तर असं दिसून येत आणि कासव मित्र मोहन उपाध्याय असं सांगतात कि, २००२ साली चिपळूणची एक संस्था आहे सह्याद्री निसर्गमित्र ! या संस्थे चे काही सदस्य इथे पांढऱ्या फुटाच्या समुद्री गरुडा वरती अभ्यास करण्यासाठी वेळास इथे आलेले होते, आणि तेव्हा पहिल्यांदा त्यांना किनाऱ्यावरती काही अंड्याची रिकामी साल बघायला मिळाली.त्यांनी गावात चौकशी केल्यावर एक व्यक्ती त्यांना बोलला इथे समुद्री कासव येतात.अंडी घालतात ,आणि आम्ही गावातली लोक ती अंडी चोरतो , स्वतः खातो ,बैलांना खायला घालतो आणि त्यानंतर आसपासच्या गावात जाऊन ती विकतो. तर तिथे मग त्यांच्या लक्षात आलं कि काहीतरी एक वेगळं काम इथे उभ राहू शकत म्हणून बाकिच्या राज्यांमध्ये जिथे समुद्री कासवांचे प्रकल्प होते त्यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली आणि त्यानंतर या उपक्रमाला सुरवात झाली. एक मादी कासव साधारण नोव्हेंबर ते मार्च या महिन्यात किनाऱ्यापासून व भरती रेषेपासून लांब सुक्या वाळूमध्ये जिथे शक्यतो मनुष्य किंवा कोणतेही जनावर सहज पोचू शकत नाही अशा निर्जंन ठिकाणी ते कासव रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी एक ते दीड फूट खड्डा खांदून त्यामध्ये ८० ते १५० अंडी घालते.कासवांमध्ये पालकत्व नसल्यामुळे ते मादी कासव अंडी घालून तो खड्डा पूर्ण 360 डिग्री मध्ये आपल्या पंखांच्या मदतीने झाकते व परत समुद्रात फिरते ;आणि त्या नंतर सुरु होतो त्या अंड्यांचा प्रवास !
समुद्राकाठी एका सुरक्षित जागी हॅचेरीज बांधलेले आहेत .ज्यामध्ये कासवाने घातलेली हि अंडी शिफ्ट केली जातात .कासवांच्या घरट्याचा माग त्याच्या पावलांच्या खुणांवरून काढला जातो व घरट्याची जागा निश्चित केली जाते,तिथे खड्डा खांदून तिथली अंडी कासवमित्रांच्या व फॉरेस्ट विभागाच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढून हॅचरीजमध्ये शिफ्ट केले जातात .साधारणतः ४५ ते ५५ दिवसानंतर आणि जर थंडीचा काळ असेल तर ६०दिवसानंतर अंड्यांमधून कासवांची पिल्ले बाहेर पडतात.हीच पिल्ले हॅचरीज मधून समुद्रकिनाऱ्यावर समुद्राच्या दिशेने सकाळी सहा व सायंकाळी सहा वाजता सोडली जातात. हाच क्षण पाहण्यासाठी आज कित्येक पर्यटक वेळास मध्ये येतात. दिसायला अतिशय सुंदर दिसणार हे दृश्य पाहताना जग विसरायला होते.आणि मित्रांनो ज्या क्षणाला कासवाची पिल्ले समुद्रकिनाऱ्यावर सोडली जातात तीच कासवांची जत्रा भरल्यासारखे दिसते.पण मित्रांनो आपन थोडं बारकाईने पहिले तर असं लक्षात येईल कि कासवाची हि जगण्याची शर्यत समुद्राकाठी त्यांना सोडलं कि संपत नाही तर तिथून त्यांची खरी शर्यत चालू होते ती हि जगण्यासाठी ...नक्की किती अवघड होता हा आजवरचा प्रवास त्यांचा ? विचार तुमच्या मनात आलाच ना ? चला तर मग बघुयात संवर्धनाआधी काय परिस्तिथी होती...कासवमित्र मोहन उपाध्याय यांच्या मुलाखतीत ते असे बोलतात की काही दशकांपूर्वी या किनाऱ्यावरती गावकर्यांना जवळपास 70 ते 80 घरटी रोज भेटायचीत आणि आज अशी अवस्था आहे की संपूर्ण चार ते पाच महिन्याच्या सीझनमध्ये जवळपास ५० ते ६० घरटी मिळतात .
काय कारण आहे या घटलेल्या संख्येच ? कासव कमी होण्यामागे एक मोठं कारण असं आहे आपण जिथे तिथे जे प्लास्टिक टाकतो ते नदी नाल्यातून समुद्रापर्यंत जाते. समुद्रापर्यंत गेलेले जे पांढऱ्या रंगाचं ट्रान्स्परंट प्लास्टिक असत ते प्लास्टिक समुद्रात तरंगत व ते तरंगणारे प्लास्टिक समुद्रात असणाऱ्या समुद्री कासवाला जेलीफिश प्रमाणे भासते. जेलीफिश म्हणजे कासवांचे आवडत खाद्य व कासव ते प्लास्टिक जेलीफिश समजून खाते. .गेल्या कित्येक वर्षांमध्ये मृत्यू पावलेल्या कासवांच्या बॉडी मध्ये एक ते सव्वा किलो प्लास्टिक आढळलेले आहे ही आहे माणसाची विकृती .....
आधी च्या काळात हे सगळी पिल्ले चालत समुद्रात जायची पण अंडयांमधुन बाहेर पडल्यानंतर आणि समुद्रात पोचेपर्यंत त्यांना जीवघेणी कसरत करावी लागत होती .जरी किनाऱ्यावर मादी कासवाने अंडी दिली तरी ती कोल्हे , कुत्री किंवा डुक्कर वासावरून शोधुन ,तो खड्डा उकरून कासवांची अंडी खायची,जरी काही अंडी यातून शिल्लक राहिली तरी तो खड्डा उघडा राहिला कि त्यात वातावरणनिर्मिती होत नव्हती आणि राहिलेल्या अंड्यांमधुन देखील कासव बाहेर पडत नव्हते. जरी एखादे घरटे तिथल्या स्थानिकांकडून चोरून खायचे वाचले ,अगदी त्या प्राण्यांपासून जरी वाचले आणि त्यातून कासवाची पिल्ले बाहेर पडली तरी ती पिल्ले घरट्यातून बाहेर पडून समुद्राच्या पाण्यात जाताना जर रात्रीची वेळ असेल तर खेकडे त्यांना खायचे आणि जर दिवसाची वेळ असेल तर हवेत उडणारे पक्षी त्यांना खातात.एकदा ते पाण्यामध्ये गेले कि त्या पाण्यामधले मोठे मासे त्यांना खातात.हळू हळू ती मोठी व्हायला लागली कि कोळ्यांच्या जाळ्यांमध्ये अडकणे ,कोळ्यांच्या बोटींना आपटून त्यांच्या पाठींना तडे जाणे किंवा बोटीला जे फॅन ब्लेड असतात त्यात त्यांचे पंख कापले जातात .जे आता तेलगळतीमुळे तेला चे तवंग आपण समुद्राच्या पाण्यावर पाहतो त्यामुळे सुद्दा कासवांचा मृत्यू होतो.कारण कासव पाण्यात जरी राहत असलं तरी त्याला श्वास घ्यायला डोकं वरती काढावं लागत आणि ते श्वास घेत. अश्या वेळेला ते तवंग त्यांच्या नाकामध्ये जातात आणि गुदमरून त्यांचा मृत्यू होतो....समुद्री कासवांच्या प्रजातीची संख्या खूप मोठ्या प्रमाणात घटू लागली.आज जगातील समुद्री कासवांच्या सातही प्रजाती धोक्यात आहेत.
कासव संपूर्ण नष्ट झाले तर काय होईल ?जर कासव नष्ट झाले तर ? असा प्रश्न पडतोय ना? कासव पाणी स्वच्छ करण्याचे काम करतो.आख्या आयुष्यामध्ये समुद्रातले शेवाळे खाते.समुद्रात मेलेले मासे खाते ,समुद्रात मेलेले जलचर खाते व पाणी स्वच्छ ठेवते ..तसेच जेलीफिश ची संख्या नियंत्रित ठेवते ...जगातील ग्रीन सी टर्टल हि प्रजाती शाकाहारी कासवांची मानली जाते ते समुद्रातील शेवाळे आणि गवत खाते व माश्याना अंडी घालायला जागा करून देते..अश्याप्रकारे कासव निसर्गाचं चक्र संतुलित ठेवते. जेलीफिशच्या वाढलेल्या प्रमाणामुळे पाणी दूषित होईल व संपूर्ण जीवन चक्रच बिघडेल आणि आपण त्याच जीवन चक्राचा एक भाग आहोत हे विसरता कामा नये.
वेळास ला गेलात तरी तिथे काही नियम आहेत ते आवर्जून पाळाच.....
१)कासवं सोडताना मोबाइल व कॅमेरा ची फ्लॅश लाईट बंद ठेवा .
२) समुद्रात कासवं सोडल्यानंतर समुद्रात लगेच पोहायला जायची गडबड करू नका ,कारण कासवांची हीच पिल्ले आपल्या पायाखाली येण्याची शक्यता आहे पिल्ले पाण्यात पोचल्यावर जवळपास अर्धा पाऊण तासाने पाण्यात जा..
३) वनविभागाने आणि ग्रामस्थांनी तिथं बॅरिकेट्स लावल्या आहेत त्या ओलांडून जायचा आताताईपणा करू नका.
४)वेळास समुद्र किनारा हा एक धोकादायक किनारा मानला जातो तिथं दरवर्षी कित्येक पर्यटक आपला जीव गमावतात ,तर समुद्र च्या पाण्याशी मस्ती नको..
जवळपास हजार कासवं समुद्रात सोडली तर त्यामधून एक दोन कासवंच जगली जातात. इतका जगण्याचा आकडा कमी आहे.आपण कायमस्वरूपी ऐकत आलोय माणसाने आयुष्यात कासवाच्या गतीने का होईना पुढे सरकत राहिले तरी आता गरज आहे ती माणसाने या कासवांच्या गतीने नव्हे तर सश्याच्या गतीने या कासावांसाठी आता पुढं सरकायला हवं आणि "त्यो मुळशी पॅटर्न चा डायलॉग ऐकलंय न्हवं पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकते आता त्याच प्लास्टिक मूळे हि कासवांची ची प्रजातीच संपायला लागली तर आता ती प्लास्टिक वापरायचं का न्हाय ती ठरवाचं".....
भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच एक नवीन विषयासहित ..जय शिवराय.......
9 Comments
Very nice and informative blog..keep it up👍👍
ReplyDeleteTHANK YOU
DeleteNice raje 👌👌👌👌
ReplyDeleteTHANK TOU SIR
DeleteGood job
ReplyDeleteNew blog kadhi yenar aahe👍
ReplyDeleteLAVKARACH SIR
Delete👌👌👌
ReplyDelete"Amazing write-up!"
ReplyDelete