काय परवा अचानक बातमी येऊन धडकली रिझर्व बँकेने २००० ची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला....डोक्यात पाचशे विचार येऊ लागले कि नक्की का बंद झाली असेल २००० ची नोट ?आता बाकीच्या हि नोटा एक-एक करून बंद होतील का ? अचानक नवीन अजून नोटा येतील का ?२०१६ च्या नोटबंदी सारखे पुन्हा हाल होऊ नयेत म्हणजे झालं !अचानक का बंद केली नोट ? नोटबंदीसारखं पुन्हा रांगेत उभा रहावे लागेल का ? कोणता फॉर्म भरावा लागेल ?कोठे बदलून मिळतील नोटा? असे अनेक प्रश्न आहेत तर जाणून घेऊ त्यांची उत्तरे .....आपल्या खालील लेखामध्ये
1) नोटा कुठे बदलू शकतो ?
तुम्ही बँकेत जाऊन नोट बदलून घेऊ शकता. यासोबतच आरबीआयच्या 16 प्रादेशिक कार्यालयात नोटा बदलून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरबीआयने म्हटलं की, ज्या भागात बँक नाही किंवा लांबच्या अंतरावर बँक दुर्गम भागात त्या ठिकाणचे लोक रिमोट व्हॅनद्वारेही नोटा बदलू शकतात. अशा परिस्थितीत लोकांना बँकेत जाण्याची गरज नाही.
2) बँकेत कधी जाणार ? लाईन मध्ये कुठं उभं राहणार ? घरून नाही बदलता येणार का नोटा ?
नागरिकांना घरी बसूनही दोन हजाराची नोट बदलू घेता येणार आहे. जर बँकेत जाऊन नोटा बदलणे शक्य नसेल, तर तुम्हाला घरी बसून नोटा बदलून घेता येतील. बँकमित्र तुमच्या घरी येऊन नोटा बदलून देतील, असे आरबीआयने म्हटले आहे. या सुविधेद्वारे तुम्हाला 2000 रुपयांच्या दोन नोटा म्हणजे 4000 रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून दिल्या जातील.
3) २०१६ च्या नोटबंदी सारख्या ह्या नोटा देखील वापरायच्या बंद झाल्या आहेत का?
दोन हजारांच्या नोटा या चलनातून बाद झालेल्या नाहीत तर त्या वितरणातून बाद झाल्या आहेत. दोन हजारांची नोट ही वैध असणार आहे.
4) 2 हजार रुपयांच्या फक्त 10 नोटा म्हणजे फक्त 20 हजार रुपयेच बदलता येणार का?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने केलेल्या घोषणेनुसार एका वेळी 2 हजार रुपयांच्या 10 नोटा बदलता येतील. एका वेळी, एका व्यक्तीला 2 हजार रुपयांच्या 10 नोटाच बदलता येणार आहे. समजा एखादा व्यक्ती एकाऐवजी जास्त वेळा बँकेत आला आणि नोटा बदलू लागला तर तसं करण्यास संमती आहे. रांगेत दहावेळा उभं राहून 2 हजारांच्या 100 नोटाही एखादा व्यक्ती बदलू शकतो.
5) दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी मागच्या वेळी नोटबंदी झाल्यावर जसा फॉर्म भरावा लागला तसा भरावा लागणार?
दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी फॉर्म भरावा लागणार नाही. तसंच ओळखपत्र काढण्याची आवश्यकता नसणार आहे.
6) कोणत्याही बँकेत जाऊन नोटा बदलता येणार कि ज्या बँकेचे ग्राहक आहे त्याच बँकेत जावं लागेल ?
तुम्ही बँकेचे ग्राहक नसाल तरीही तुम्ही नोटा बदलून घेऊ शकता. दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी तुमचं खातं आहे तिथेच तुम्हाला नोटा बदलता येतील असं नाही.
7) नोटा कुठे बदलू शकतो?
तुम्ही बँकेत जाऊन नोट बदलून घेऊ शकता. यासोबतच आरबीआयच्या 16 प्रादेशिक कार्यालयात नोटा बदलून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरबीआयने म्हटलं की, ज्या भागात बँक नाही किंवा लांबच्या अंतरावर बँक दुर्गम भागात त्या ठिकाणचे लोक रिमोट व्हॅनद्वारेही नोटा बदलू शकतात. अशा परिस्थितीत लोकांना बँकेत जाण्याची गरज नाही.
8) कधी पासून कधी पर्यंत आपण नोटा बदलू शकतो ?
23 मे पासून 30 सप्टेंबर पर्यंत जनतेला नोटा बदलून घेता येतील.
9) 2000 रुपयांच्या नोटा बदलायला किंवा जमा करून घ्यायला बँकांनी नकार दिला तर काय करायचे?
सर्वसामान्य जनता 2000 रुपयांच्या बँक नोटांचा त्यांच्या व्यवहारासाठी वापर करू शकते .मात्र 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी या नोटा बँकेत जमा करण्याचे किंवा त्या बदलून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण जर 2000 रुपयांच्या नोटा बदलायला किंवा जमा करून घ्यायला बँकांनी नकार दिला तर काय करायचे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यावर आरबीआयने स्पष्टीकरण दिले आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, ग्राहकांनी पहिला संबंधित बँकेशी संपर्क साधू शकतात. बँकेने 30 दिवसांच्या कालावधीत प्रतिसाद दिला नाही किंवा बँकेचा प्रतिसाद समाधानकारक नसेल तर भारतीय रिझर्व्ह बँकेकडे एकात्मिक लोकपाल योजना (RB-IOS), आरबीआयच्या तक्रार व्यवस्थापन प्रणाली पोर्टलवर (cms.rbi.org.in) तकार नोंदवता येईल.
10) दोन हजारांची नोट वैध आहे का? त्याद्वारे व्यवहार केले जाऊ शकतात का?
RBI च्या घोषणेनुसार दोन हजारांच्या नोटा वैध आहेत. त्यामुळे या नोटा द्वारे व्यवहार करता येऊ शकतो.
11) बँक खातं नसेल तरीही 2 हजारांच्या नोटा बदलता येतील का?
होय. बँक खातं नसेल तरीही दोन हजारांच्या नोटा बदलता येणार आहेत. कुठल्या बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊन दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत.
12 ज्येष्ठ नागरिक दोन हजारांच्या 10 पेक्षा जास्त नोटा बदलू शकतात का?
ज्येष्ठ नागरिकही एका वेळी 10 नोटाच बदलू शकतात. ज्येष्ठ नागरिकांना दहाच नोटा बदलता येणार आहेत. वरिष्ठ नागरिकांनाही दहा नोटा कितीहीवेळा बदलता येणार आहेत.
0 Comments